तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम आरसुळ येथील एका किराणा दुकानात चोरट्यानि डल्ला मारला असून यामध्ये जवळपास ७० हजाराचा माल चोरट्यानि लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली.
अकोला जिल्ह्यातील चोहोट्टा बाजार येथे चोरट्यानि दागिन्यांच्या दुकानावर डल्ला टाकला असल्याची बातमी ताजी असतांना तेल्हारा तालुक्यातील आरसुळ येथील मोहन चांडक यांच्या किराणा दुकानावर चोरट्यानि डल्ला मारलाअसून यामध्ये जवळपास नगद व इतर ७० हजाराचा माल चोरट्यानि लंपास केला.ही घटना आज उघडकिस आली.यावेळी अकोला येथील श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी शोध घेतला मात्र काही मिळून आले नाही.मुख्य चौकातील दुकानावर डल्ला मारल्याने चोरट्याने एक प्रकारे पोलिसाना सलामी ठोकली आहे.सदर घटनास्थळी PSI हर्षल चाफले यांनी घटनास्थळ गाठून तपास केला असून तेल्हारा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
अधिक वाचा : चौहट्टा बाजार पोलीस चौकीसमोर दोन दुकाने फुटले!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola