अकोला (निलेश किरतकार) : अकोला शहरातील बेताल वाहतुकीला तालावर आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या आदेशावरून तसेच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या मार्गदर्शनात गत काही दिवसात वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटिल यांनी शहरातील चौकाचौकात अचानक तपासणी करून एक हजाराच्या वर वाहनधारकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल लाखाच्या वर दंड वसूल करण्यात आलाय.
अकोला शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व मंगळसूत्र चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी शहरातील मुख्य असलेल्या चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी मध्ये वाहन चालकाच्या मूळ परवान्याची तपासणी करण्यात आली असून, ज्यांच्याकडे परवाना नाही, अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलीये.
तसेच वाहनाचे दस्तऐवज नसणारे वाहन ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचे मूळ दस्तऐवज तपासून त्यांची वाहने सोडण्यात आली. यासोबतच ट्रिपल सिट वाहन चालविणे , सिग्नल तोडणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, वाहने चालविताना मोबाईलचा वापर करणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलीये. वाहतूक शाखेकडून तब्बल एक हजारावर वाहनांवर कारवाई करीत त्यांच्या कडून लाखोंचा दंड वसूल करण्यात आलाय. वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटिल यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हो मोहीम राबवून कारवाईचा सपाटा कायम ठेवला आहे.
अधिक वाचा : तेल्हारा येथील २७ वर्षीय युवकाची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola