तेल्हारा(प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शिक्षकाने शाळेतच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शिक्षक गजानन नारायण इंगळे रा तेल्हारा यांनी आज दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान शाळेतील एका वर्गखोली मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली.सदर आत्महत्त्या मुख्याध्यापक यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात असून गजानन इंगळे यांनी यांनी एका वर्ग खोलीत आत्महत्या केल्याची बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इंगळे यांना ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.आत्महत्याने राजीव गांधी विद्यालयात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करणार आहेत.
अधिक वाचा : शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola