मूर्तिजापूर (प्रतिनिधी) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून जांभा बु. येथील ५५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. मधुकर नथ्थूजी भटकर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मधुकर भटकर यांच्याकडे सहा एकर कोरडवाहू शेती आहे. अलिकडेच त्यांनी आपल्या शेतात बोअर केले होते. त्यांनी शेती मशागत व इतर कामासाठी बँक बडोदाचे ९९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच काही खासगी फायनान्सकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या काही दिवसांपासून शेतात अपेक्षीत उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत रविवारी त्यांनी गावालगत असलेल्या एका शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून व आप्त परिवार आहे.
अधिक वाचा : तेल्हारा येथील २७ वर्षीय युवकाची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola