अडगाव बु (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु।। येथे ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दहावी व बारावि च्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री संजय वानखडे (एक्स आर्मी ऑफिसर ) तसेच श्री एस एस माळी सर (ठाणेदार हिवरखेड )व जिल्हा परिषद सदस्य श्री गोपाल भाऊ कोल्हे,माजी सरपंच श्री अशोक भाऊ घाटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विलास वानखडे होते,ध्वजारोहण श्री संजय वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन,लेझीम नृत्य तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले व मी सावित्री बोलते हे समाजाला शिकवण देणारे एकपात्री नाटक सादर केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त २०१८ मध्ये वर्ग दहावी मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी अमर विजय वानखडे व बारावीमध्ये प्रथम आलेला करण संजय अवचार व दहावीच्या रिटेल विषयांमध्ये महाराष्ट्रातून प्रथम आलेली कुमारी नेहल चतुरसिंह बैस व कुमारी कोमल मिलिंद वानखडे व हेल्थ -केअरमध्ये शाळेतून प्रथम आलेली कुमारी चैताली केशव धामोडे ला उपस्थित गणमान्य व्यक्तींच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये तंबाखूमुक्त शाळा व कॉपी मुक्त शाळा याची विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना शपथ देण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष सोळंके सर व इसाक सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्राध्यापक श्री जाधव सर व श्री संजय भटकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
अधिक वाचा : मैत्रेय वाचनालयात महात्मा गांधी स्मृतिदिन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola