अकोला (प्रतिनिधी) : रेल्वेच्या गेटमध्ये बसलेल्या चंद्रपूरच्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना अकोला येथील कैची पुलाजवळ घडली. सुनील वाघमारे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलीस स्थानकामध्ये कार्यरत असलेले सुनील काशिनाथ वाघमारे (२९, बक्कल नं. २४१३) हे रेल्वेने (क्र. १२६१) प्रवास करीत होते. ते रेल्वे डब्याच्या गेटमध्ये बसलेले होते. त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. त्यातच गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातावेळी पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे हे घटनास्थळी होते. मृत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
अधिक वाचा : मोटारसायकल घसरल्याने महिलेचा मृत्यू; पती- मुलगा गंभीर जखमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola










