अकोट (प्रतिनिधी) : शहरातील धारोळी वेस वर राहनारा तकदीर खान कलीम खान वय ४२ वर्ष यांना जन्मापासून दिसत नाही कानाने एकु येत नाही बरोबर बोलता येत नाही तरीही कुदरत का अजब गजब कमाल मध्ये अशी हकीकत आहे की मोटर वाहनाचे हॉर्न दुरुस्ती करण्याचे कसब त्यांनी जोपासले आहे.
तकदीर खान २००३ पासून एअर हॉर्न सोडून इतर सर्व हार्न बरोबर दुरुस्ती करीत आहे ४० वर्षापासून त्यांची एकच छोटी दूकान अकोला नाक्यावर आहे त्याच्या घरून ते अकोला नाका असे १ किलोमीटर अंतर दिसत नस्तांना ते एकटे पायदल जाने येणे करतात सध्या दूकान धारोळी वेस येथे आहे. त्यांच्या कड़े अकोला जिल्ह्यातील मोटर वाहन जिप ट्रेक्टर ट्रायवल ऑटो असे विविध प्रकारचे वाहनांचे हार्न दुरुस्ती करण्यासाठी येत असतात सकाळी त्यांच्या वेळ ११ ते ४ अकोला नाका व धारोळी वेस येथे सायं ५ ते ९ वाजेपर्यंत मोटर लाइन मध्ये दिलेल्या वेळेत ते हॉर्न दुरुस्ती साठी काम करतात एक हॉर्न दुरुस्ती साठी ५० ते ६० रुपए घेतात त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नसून राजीव गांधी योजना मधून १८ वर्षापासून ५०० रूपये रुपए अनुदान मिळत होते ते पण बंद झालेले आहेत.
शासनाकडून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. अकोट मधून सर्व हिन्दू मुस्लिम बांधावांमध्ये ते सुप्रसिध्द आहे जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील असा माणूस एकमेव असावा निराधार असलेल्या या क्लाकाराला डोळे नस्तांना काम कसब हस्तगत झाल्या आहे त्यांची प्रेरणा घेवून अनेकांनी त्यांच्या कौतुक केले. तसेच शासनाने पण त्यांची कार्याची व हालाखीची परिस्तिथिचि दखल घेवून शासकीय योजनेचा लाभ त्यांना द्यावा. तसेच दानदात्यांनी त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे या कामामुळे त्यांनी खरच एक आदर्श निर्माण केला आहे.
अधिक वाचा : शेतक-याच्या लेकीला पाहायला गेले अन आदर्श लग्न करून आले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola









