रिसोड (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिखली सरनाईक येथे शेतातील जुन्या वादातुन एका युवकाचा खुन झाला आहे. ही घटना गुरुवार सकाळी सात वाजताच्या सुमारास चिखली शेतशिवारात घडली आहे. मृतकाचे नाव पवन पंडितराव सरनाईक वय 23 आहे. मृतक आणि मारणारा आरोपी हे सख्ये चुलत भाऊ आहेत.
मृतकाचे वडील पंडीतराव सरनाईक व आरोपीचे वडील डिगांबरराव सरनाईक हे सावत्र भाऊ असून यांच्यात गत १० वर्षापासून शेतीचा वाद होता. सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून याच वादातून डिगांबर सरनाईक हे सहकुटुंब चिखली गाव सोडून केशवनगरला राहायला गेले होते. मधल्या काळात मृतक पवन सरनाईक यांचे कुटुंबीय चिखली येथील त्यांचे शेत वैती करता चिखली येथे वास्तव्यास होते.
दरम्यान घटनेच्या दिवशी गुरुवार10 जानेवारी रोजी मृतक पवन सरनाईक हा दैनंदिन नित्यनेमाप्रमाणेने त्याच्या शेतात रात्री झोपायला गेला होता. सकाळी शेतातुन घराकडे परतीच्या मार्गावर असतांना शेतामध्येच दिगंबर सरनाईक व गजानन सरनाईक यांनी त्यास अडविले व विचारणा सुरू केली. की माझ्या न का जातो असे मृतक पवन सरनाईक यास हटकले असता त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले दरम्यान आरोपी गजानन सरनाईक व त्याचे वडील दिगंबर संजाबराव सरनाईक या दोघा बापलेकांनी पवन सरनाईक यास धरून पोटात चाकू भोसकून ठार केले.
घटनेची फिर्याद शंकर गोविंद सरनाईक यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिली असून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गजानन दिगंबर सरनाईक व पंजाबराव सरनाईक यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा तपास निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिरसाट करीत आहेत.
अधिक वाचा : अकोला एमआयडीसीत गुटखा जप्त, एसपी च्या विशेष पथकाची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola