अकोला (प्रतिनिधी) : स्थानिक एमआयडीसी परिसरातील एका गोदामावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्ष राज अलसपुरे यांनी छापा टाकून तब्बल पाच लाख रापायांचा गुटखा जप्त केला.
एमआयडीसी परिसरात लाखो रुपायांच्या गुटख्याचा अवैध साठा असल्याच्या गुप्त महितीवरुन एसपी च्या विशेष पथकाने एमआयडीसी परिसरात छापेमारी केली. पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सदर गोदामावर छापा टाकून पाच लाख रुपयांचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला. त्यानंतर गुटख्याच्या मालकाचा शोध घेण्यात आला असून, त्यास समजपत्र देऊन सोडण्यात आले.
डबल एन गुटखा माफियांची जोडी सक्रीय
नरेश आणि निलेश या दोन गुटखा माफियांची जोडी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या गुटखा माफियांना पोलिसांचे च अभय असल्याची जोरात चर्चा असून या माफियांनी पोलिसांचे खबरे असल्याचीच भूमिका बजावणे सुरु केल्याचेही सांगितले.
अधिक वाचा : इंडिका कार मधून गायींची निर्दयपणे वाहतूक-गुन्हा दाखल!अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola