अकोट(प्रतिनिधी)- एकटेपणाने झुंजणाऱ्या पत्रकारांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. माध्यमातील लिखाणाने समाजात निश्चित बदल घडत असतात. प्रामाणीक पत्रकारांना बळ दिले पाहिजे, समाज त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे ही भावना लोकजागर मंच च्या माध्यमातून मा. अनिल गावंडे यांची आहे. लोकजागर मंच करीत असलेले आदर्श समाज रचनेचे कार्य समाजाभीमुख मांडण्याचे कामात सातत्याने पत्रकार मंडळी करीत आहेत.त्यासाठी त्यांचे कौतुक व्हावे हे क्रमप्राप्त आहे.
पत्रकारदिनाचे औचित्याने अकोट येथील पत्रकार बंधुंचा कार्यगौरव व कौतुक सोहळ्याचे आयोजन स्थानीक लोकजागर मंच संपर्क कार्यालयात केले होते. याप्रसंगी सर्व पत्रकारांचे लोकजागर मंच जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व सरचिटणीस अनंतराव सपकाळ यांनी पत्रकारांच्या कार्याप्रती विचार व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला लोकजागर मंचचे राजेश गावंडे, सूरज शेंडोकार, आकाश बरेठिया योगेश जायले, अर्जुन गाळखे, अमित डोबाळे, मयूर भगत, श्याम पाथ्रीकर, श्रीजीत गडम,रौनक जयस्वाल,आनंद रोडे पाटील, मुजाहिद खान, राजू मानकर, गणेश गडम,अभिजीत कोकाटे, अक्षय मामनकर,शुभम राऊत, चेतन गुरेकार,शाम लटकुटे,अक्षय मोकाशे, केशव लोखंडे, शाम राठी आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थीत होते.
अधिक वाचा : लोकजागर मंचाच्या अकोट कार्यालयास आ श्रीकांत देशपांडे यांची सदिच्छा भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola