अकोला :- मनुष्य जीवनात वाचनाचे फार महत्व आहे. मनुष्य जे वाचतो, जे लिहीतो ते कधीही विसरत नाही. मानवी जीवनात देवालयाइतकेच वाचनालयाचे महत्व आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ग्रंथोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यक माजी संमेलन अध्यक्ष विदभ साहित्य संघाचे डॉ. विठ्ठल वाघ हे होते. यावेळी विदर्भ चेंबर्स ऑफ इंडस्ट्रिज चे अध्यक्ष महेंद्र दर्डा , सहायक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथपाल अतुल वानखडे, ग्रंथमित्र डॉ. एस.आर. बाहेती कृषि किर्तनकार महादेवराव भुईभार डॉ. पुरूषोत्तम तायडे, डॉ. अशोक ओळंबे , नगरसेवक आशिष पवित्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरीब विदयार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता दालन निर्माण व्हावे यासाठी नवीन सुसज्ज अशी शासकीय ग्रंथालयाची इमारत तयार करण्यात आली आहे. असे सांगुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, मी शहरातील नागरीकांना असे आवाहन करतो की, त्यांनी वाचन संस्कृती निर्माण व्हावी यासाठी आपल्या शुभप्रसंगी काहीतरी पुस्तके खरेदी करून ग्रंथालयास भेट दयावी. आहे रे समाजाने नाही रे समाजाला दान करावे त्यामुळे वाचन संस्कृती पुढे जाऊन समाजाला सुजान व सुज्ञ नागरीक मिळतील असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल वाघ म्हणाले की, देवळात जाऊन अंध्दश्रध्देचा बळी होण्यापेक्षा जीवनाला आदर्श मार्ग दाखविण्याचे काम वाचनालय करीत असतात. त्यामुळे ग्रंथ वाचनामुळे मनुष्याचे जडणवळण होत असते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे ग्रंथपाल अतुल वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत चांगडे व आभार प्रदर्शन मनोज देशमुख यांनी केले. यावेळी वाशिम जिल्हयातील केत उमरा येथील अंध विदयालयाच्या विदयार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. दिग्रस तालुक्यातील वसंत नगर येथील प्रताप महिला मंडळाने बंजारा गीत सादर केले.यावेळी पालकमंत्री यांनी पुस्तकांचे स्टॉलचे उद्घाटन केले. या ग्रंथोत्सवात विविध पुस्तक प्रकाशकांनी आपले पुस्तके प्रदर्शनी व विक्रीसाठी ठेवले आहेत. पुस्तक प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रंथ दिंडीने दुमदुमले शहर सकाळी 9.30 वाजता जिल्हा ग्रंथालय येथुन ग्रंथ दिडींचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथ दिडींला महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ग्रंथोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ॲड. मोतीसिंह मोहता , महादेवराव भुईभार, एस.आर. बाहेती, ॲड. मोहन आसरकर, राम मुळे, सहायक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथपाल अतुल वानखडे , ग्रंथालय कार्यालयाचे नवल कव्हळे ,विविध वाचनालयाचे पदाधिकारी ग्रंथोत्सव संयोजन समितीचे सदस्य तसेच विविध शाळेचे विदयार्थी यांची उपस्थिती होती. टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी निघालेली ग्रंथ दिंडी शहरातील ग्रंथ प्रेमींचे लक्ष वेधुन घेत होती.
ग्रामीण व शहरी लोकांमध्ये वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी या हेतुने. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परिसर, दामले चौक, स्व. वसंत देसाई क्रीडांगणाच्या बाजूला, अकोला येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात परिसंवाद, वाचन संस्कृती चर्चासत्र व संदिपपाल महाराज यांचे प्रबोधन असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहे.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola