बुलढाणा : नववर्षाला तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात दारु पिऊन स्वागत करतात हे प्रत्येक वर्षी समोर आले आहे. या परंपरेला फाटा देत शिवसंग्रामचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले यांनी नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत करा असा संदेश देत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुध वाटपाचा कार्यक्रम सैनिक मंगल कार्यालयाच्या बाजुला सोमवार 31 रोजी दूध वाटप करुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
सदा सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे गणेश भोसले यांनी मनोरुग्णांना मिठाई व फराळाचे वाटप करणे, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करणे, रक्तदान शिबीर व मोफत रक्तगट शिबीर राबविणे, अपंग मुलीस दत्तक घेणे, सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळ वाटप करणे यासह विविध सामाजिक उपक्रम त्यांनी गेल्या 7 ते 10 वर्षापासून राबविले आहे. गत दोन वर्षापासून युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्याच्या हेतूने यावर्षी त्यांनी दूध वाटप कार्यक्रम राबविला असून या उपक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. गणेश भोसले यांनी केलेल्या व्यसनमुक्तीपर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिक वाचा : मॉर्निंग वॉकला जाणे जिवावर बेतले..मलकापुरात अज्ञात वाहनाने तरुणाला चिरडले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1