‘गली बॉय’ हा रणवीर- आलियाचा आगामी चित्रपट असून त्याचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट एक म्युझिकल ड्रामा असणार आहे. ‘अपना टाइम आएगा’, असं कॅप्शन देत रणवीर आणि आलियाने सोशल मीडियावर हा पोस्टर शेअर केला. या पोस्टरमध्ये रणवीरची स्पष्ट झलक दिसत नसून हूडी घातलेला एक व्यक्ती पाहायला मिळत आहे. रणवीर आणि आलिया या दोन्ही कलाकारांचा उत्साह आणि एकंदर त्यांच्या अभिनयाची शैली पाहता त्यांच्या भूमिका हे दोघेही चांगलीच वठवतील यात शंका नाही.
Apna Time Aayega! #GullyBoy #14thFeb #2019 @ritesh_sid #ZoyaAkhtar @FarOutAkhtar @excelmovies #TigerBaby @aliaa08 @ZeeMusicCompany pic.twitter.com/9AnFhUUADM
— Ranveer Singh (@RanveerOfficial) January 1, 2019
चित्रपटात रणवीर आणि आलियासोबत कल्की कोचलिनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ती एका रॅपरची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीर सिंगने याआधीही झोया अख्तरसोबत ‘दिल धडकने दो’ या सिनेमात काम केले होते. पण, झोयाच्या दिग्दर्शनात काम करण्याची आलियाची ही पहिलीच वेळ आहे. ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
अधिक वाचा : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola