अकोला (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अंतर्गत अकोला महानगर पालिका क्षेत्रातील घटक क्र. ४ अंतर्गत विविध प्रभागातील एकूण १७६१ घरकुलांच्या प्रस्तावाला महाराष्ट्र व केंद्र सरकार ने मंजुरी दिली आहे.
सदर प्रकल्पाला निधी वितरित करण्यापूर्वी तपासणी करण्याकरिता केंद्रीय चमू अकोल्यात दाखल झाली आहे. या चमूतर्फे अकोला शहरातील मंजूर झालेल्या निवडक घरकुल प्रकल्पांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी के. के. प्रवीण, सहायक महाप्रबंधक (परियोजना) यांच्यासह चमूतील सदस्यांनी केली. तपासणीअंती या चमूने प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले असून पुढील निधी वितरणासाठी सदर अहवाल शासनास सादर करणार आहेत. केंद्रीय चमूने महापौर विजय अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली. महापौर यांनी यावेळी चमूतील सदस्यांचा सत्कार केला.
यावेळी नगरसेवक अनिल मुरूमकर, पंतप्रधान आवास योजनेचे प्रकल्प अभियंता माणिकराव, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मनीष भुतडा, विशाल गवई उपस्थित होते.
अधिक वाचा : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोल्यात 30 व 31 डिसेंबरला महाआरोग्य अभियान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola









