मुर्तिजापूर (प्रकाश श्रीवास)- मूर्तिजापूर तालुक्यातील विरवाडा गावातील ४३ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांची विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली आहे. जितेंद्र नारायण गवई असे शेतकर्यांचे नाव असून त्याच्याकडे ३ एकर शेती असल्याने कमी उत्पन्नात परिवाराचा गाडा चालविणे कठीण झाल्याने त्यासाठी बँकेचे कर्ज त्यातच अनेकांकडून घेतलेले खासगी कर्ज,आर्थिक तंगीला कंटाळून मागील रविवारी विष प्राशन केले होते. त्याचा उपचार दर्यापूर येथील खाजगी रुग्णालयात सुरू होता.सतत आठ दिवस सुरू असलेल्या उपचारा नंतर शेवटी आज त्याचा मृत्यू झाला त्या पश्चात वडील,दोन मुली,पत्नी असा आप्त परिवार आहे.
अधिक वाचा : मंदुरा हत्या प्रकरणातील आरोपीना अटक करा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola