मूर्तीजापुर ( प्रकाश श्रीवास) : येथून जवळच येत असलेल्या माना पोलीस स्टेशन अंर्तगत येणाऱ्या मंदुरा( पोता) येथे दि.५ सप्टेंबर २०१८ रोजी गावातीलच शुभम देवानंद तेलमोरे याची चाकुने वार करून हत्या करण्यात आली होती. हया हत्या प्रकरणातील आरोपीना अधापही अटक करण्यात आली नसुन ते गावातच वावरत असल्याने त्यांना त्यांच्या पासुन आमच्या परीवाराचे जिवीत्तवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याना तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी एक निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक आकोला यांना देवुन मयताचे वडील देवानंद भाऊराव तेलमोरे यांनी केली आहे. दि.२ आकटोंबर गांधी जयंती पर्यंत न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर संपूर्ण परीवारासह आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माना पोलीस स्टेशन अंर्तगत येणाऱ्या मंदुरा येथील गावातील रवी गौतम तेलमोरे, विककी मनोहर श्रीवास, जितेंद्र गजानन सुलताने हे तिघे देवानंद तेलमोरे यांच्या घरी दि.५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता आले.मुलगा शुभम तेलमोरे याला अंगावर शर्ट ही घालू न देता घेवुन गेले.उशिरा रात्रीपर्यंत वाट पाहली पण शुभम घरी आला नाही. दुसरे दिवशी माना पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील हे दुसरे दिवशी सकाळी आले आणि माझ्या मुलाविषयी विचारणा करू लागले. रात्री घडलेली घटना कथन केल्यानंतर त्यांनी शुभमचा मृतदेह रामा चौके यांच्या घरात पडला आहे. त्याची हत्या झाली आहे.
माहिती मिळाल्यानंतर देवानंद जामनीक घटनास्थळी गेले असता त्यांना शुभमचा मृतदेह रक्कताचे थारोळ्यात पडलेला दिसला.माझ्या मुलाची संगणमत करून रामा चौके,कौशल्या चौके,प्रिती चौके,शामा चौके यांनी हत्या केली आहे असा आरोप शुभमच्या वडिलांनी करून तक्रार देण्यास तयार असताना सुध्दा जाणीवपूर्वक आरोपीस फायदा होण्यासाठी माझी तक्रार दाखल केली नाही. व गावातील पोलिस पाटील यांची सकाळी ०९/१८ वाजता अज्ञात मारेकरी म्हणून पोलिसांनी तक्रार दाखल केली. माझ्या मुलाची वरील इसमांनी ०१.४५ वा हत्या केली आहे.गुन्हयातील सत्य परिस्थिती तपासा दरम्यान समोर यावी.व आरोपींना लवकर अटक करावी. तसेच पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी व ठाणेदार ज्यांनी आरोपीला वाचवण्यासाठी वेळ दिला व माझ्या मुलाचे प्रेत सकाळ पर्यंत घटनास्थळी ठेवले. व चाकु मारल्या बाबत माहिती मिळूनही उपचारासाठी पाठविले नाही. उपचाराअभावी मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घटनेरोजी चे सर्व आरोपी, पोलीस पाटील, रात्रीला डियुटी वर असणारे अधिकारी,ठाणेदार यांचे मोबाईल नंबर ची तपासणी करून त्यांना त्यांचा ही सदर गुन्हयात सहभाग असल्यास त्यांना ही सह आरोपी करावे.अशी ही मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जर दि.२ आँकटोबर गांधी जयंती पुर्वी न्याय न मिळाल्यास संपूर्ण परीवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचा इशारा देवानंद तेलमोरे यांनी दिला आहे.
अधिक वाचा : मुर्तिजापुर ब्रेकिंग : दूषित पाण्यामुळे ८० लोकांची तबेत खराब
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola