अकोला : केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापना व नियमन २००१ च्या नियम ३ मधील तरतुदीनुसार संदर्भाधीन अधिसूचनेन्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करणाऱ्या जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर दूरदर्शनचे वृत्तप्रतिनिधी विशाल प्रभाकर बोरे यांची ‘व्यवस्थापकीय समिती अशासकीय सदस्यपदी’ महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्य शासनाने १६ नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती करण्यात आली.
सदर अशासकीय सदस्य पदाचा कार्यकाळ हा नियुक्तीपासून तीन वर्षे राहणार असून जिल्हा प्राणी क्लेश सोसायटीच्या माध्यमातुन प्राण्यांच्या संरक्षणाबाबत हितकारक कार्य करण्यात येणार आहे व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी विशाल बोरे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
अधिक वाचा : 27 नोव्हेंबर पासून अकोला जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम आयोजित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola