• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

शाओमीचा 4 कॅमेऱ्यांचा Redmi Note 6 Pro भारतात लाँच

adil by adil
May 18, 2020
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
77 2
0
Redmi Note 6 Pro
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : शाओमी कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 6 Pro अखेर भारतात लाँच केला आहे. गुरूवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आणि याच्या किंमत व वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली. याआधी बाजारपेठेत असणाऱ्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या Redmi Note 5 Pro या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे. या फोनच्या पुढील बाजूला दोन आणि मागील बाजूला दोन अशाप्रकारे चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यापूर्वी थायलंड आणि इंडोनेशियात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता.

शाओमीने नव्या रेडमी नोट 6 प्रोच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये ठेवली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन 23 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवर ‘ब्लॅक फ्रायडे सेल’मध्ये विशेष किंमतीत उपलब्ध असणार आहे. या सेलमध्ये 4 जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आणि 6 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये असणार आहे. कंपनीने ब्लॅक फ्रायडे सेलसाठी HDFC बँकेशी भागीदारी केली आहे. याद्वारे 500 रुपयांची सूट मिळेल. शुक्रवारी एका विशेष सेलचं देखील आयोजन केले जाणार आहे. २३ नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजेपासून स्मार्टफोनसाठी सेल सुरू होईल. एमआय स्टोअर्स आणि शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावरही हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. रेड, ब्ल्यू, रोज गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. रिलायंस जिओसह केलेल्या भागीदारीअंतर्गत या फोनवर 2,400 रुपये कॅशबॅक आणि 6 टीबी अतिरिक्त 4जी डेटा मिळेल. याशिवाय या फोनसोबत कंपनीकडून एक ‘प्रोटेक्टिव केस’ मोफत दिली जाणार आहे.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

फिचर :

Redmi Note 6 Pro हा फोन दिसायला जवळपास Note 5 Pro प्रमाणेच आहे. याच्या पुढील आणि मागील बाजूला ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. म्हणजे एकूण चार कॅमेरे यात आहेत. सेल्फीसाठी असलेल्या दोन कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा 20 मेगापिक्सलचा तर दुसरा 2 मेगापिक्सलचा आहे. मागील बाजूला 12 आणि 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये रेडमी नोट 5 प्रो प्रमाणेच 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट 6 प्रो MIUI 10 वर आधारित अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत असेल. यामध्ये 6.26 इंच आयपीएस एलसीडी फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे.

अधिक वाचा : Jawa च्या 3 शानदार मोटरसायकल भारतात लाँच

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Redmi Note 6 ProRedmi Note 6 Pro Launched in India
Previous Post

बाळासाहेबांच्या स्मारकाला भूखंड मिळत नाही, यासारखं दुसरं दुर्दैव नाही- राज ठाकरे

Next Post

World Boxing Championship : मेरी कोम अंतिम फेरीत दाखल; भारताला सहावं सुवर्णपदक आशा

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
मेरी कोम

World Boxing Championship : मेरी कोम अंतिम फेरीत दाखल; भारताला सहावं सुवर्णपदक आशा

भारिप बमस तेल्हारा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी सौ.माधुरी हीवराळे यांची निवड

भारिप बमस तेल्हारा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी सौ.माधुरी हीवराळे यांची निवड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.