नवी दिल्ली : Jawa मोटरसायकल आज अखेर भारतात लाँच झाली आहे. कंपनीने या मोटरसायकलचे ‘जावा, जावा 42 आणि जावा पेराक’ असे तीन नवे मॉडेल्स सादर केले आहेत. महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिच्या क्लासिक लीजंड्स या कंपनीच्या पुढाकाराने जावा ही अत्यंत प्रतिष्ठेची व भारतात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेली मोटरसायकल अखेर भारतात लाँच झाली आहे.
दी जावा – 1.64 लाख रु , जावा 42 – 1.55 लाख रु , जावा पेराक – 1.89 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
आज लाँच करण्यात आलेल्या तीन मॉडेल्सपैकी दोन मॉडेल्समध्ये 293 सीसीच्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे, तर Jawa Perak मध्ये 334 सीसीच्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल 1929 साली जन्माला आलं ते 499 सीसीचं होतं. देशभरात एकूण 105 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, तसंच डिसेंबरपर्यंत अजून 64 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी आणि टेस्ट राइडसाठी उपलब्ध होईल असं लाँचिंग कार्यक्रमात सांगण्यात आलं आहे.
क्लासिक लीजंड या महिंद्रांच्या मालकिच्या कंपनीनं झेक ब्रँडच्या भारतातल्या विक्रीसाठी आवश्यक ते परवाने घेतले आहेत. मध्यप्रदेशमधल्या पिथमपूर इथल्या कारखान्यात जावाचं उत्पादन केलं जात आहे. विशेष म्हणजे जावाची स्वतंत्र ओळख जपण्यात येणार असून गाडीवर महिंद्राचा लोगो लावण्यात येणार नाही व डीलर्स वगैरे वेगळे नेमण्यात येणार आहेत. सध्या अशा प्रकारच्या हायएंड बाईक्सची मोठी चलती असून हार्ले, डुकातीसारख्या विदेशी कंपन्यांच्या मोटरसायकलनाही विशेष मागणी आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळी तरूणाईनं उचलून धरलेल्या जावाला आताचा तरूण वर्ग कसं स्वीकारतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अधिक वाचा : एअरटेल नवा प्लॅन; ७० दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola