वर्धा येथील पुलगावमध्ये असणाऱ्या लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ बॉम्ब निकामी करताना आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार कर्मचारी मृत झाले असून काही लोक जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या स्फोटामुळे परिसरात हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारतीय लष्करासाठी पुरवठा होणाऱ्या दारुगोळ्याचे भांडार पुलगावमध्ये आहे. या शस्त्र भांडाराजवळ ऑर्डिन्स फॅक्टरीची रेंज असून या ठिकाणी जुने झालेले बॉम्ब निकामी करण्यात येतात.
माहीती नूसार जबलपूर ऑर्डिन्स फॅक्टरीतून काही कर्मचारी जुना दारुगोळा निकामी करण्यासाठी पूलगावमध्ये आले होते. त्यातील एक बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला. या स्फोटात ऑर्डिन्स फॅक्टरीचे कर्मचारी शहीद झाले तर, स्थानिक नागरिक जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माहीती असावी या आधी देखील जून २०१६ मध्येदेखील पुलगावच्या शस्त्र भांडाराला आग लागली होती. या आगीनंतर परिसरात मोठे हादरे बसले होते. त्यावेळी स्फोटाचे हादरे १५ किलोमीटरपर्यंत जाणवले होते. आग लागलेल्या ठिकाणाहून दारुगोळा अन्यत्र हलवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.
अधिक वाचा : शिवशाहीची ट्रकला मागून धडक; कुणीही जखमी नाही
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola