अकोला (शब्बीर खान) : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रामटेक – नवसाळ फाट्यानजीक उभ्या असलेल्या पंचर आयशर ट्रकला शिवशाही ने मागून जबर धडक दिल्याची घटना आज सोमवार दि.१९ नोव्हेबरला सकाळी ५:४५ वाजतादरम्यान घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही, मात्र शिवशाही व ट्रकचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जालनावरून नागपूरकडे जाणारी शिवशाही बस क्र.एम एच ०२ ई आर ४०७७ ने अकोल्यावरून अमरावतीकडे पोती वाहून नेणारा पंचर स्थितीत रोडच्या कडेला उभा असलेला आयशर ट्रक क्र. एम एच २१ एक्स ११३५ ला हा मागून जबर धडक दिल्याने शिवशाही व ट्रक मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, मात्र यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच कुरूम चौकीच्या पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
अधिक वाचा : जिल्ह्यातील 52,800 विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासासाठी पास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola