मुंबई : बॉलिवूडमधील स्टार कपल रणवीर आणि दीपिका (दीपवीर) चा लग्न समारंभ इटलीमध्ये पार पडला. दोघांचं सुरुवातीला कोंकणी व नंतर सिंधी पद्धतीनं लग्न झालं. पण या जोडप्याने सिंधी पद्धतीनं लग्न करताना रितीरिवाज पाळले नसल्याचा आरोप केला जातोय.
दीपवीर नं आनंद कारजसाठी (शीख पद्धतीनं लग्न) ‘गुरू ग्रंथ साहिब‘ या शीख धर्मियांच्या पवित्र ग्रंथाला इटलीतील हॉटेलमध्ये मागवलं होतं. यावर शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. शीख पद्धतीनं लग्न करताना जोडप्याने गुरूद्वारात जाऊन लग्नाचे विधी करण्याची प्रथा आहे. मात्र दीप-वीरनं असं नं केल्यानं शीख समुदाय नाराज झाला आहे. याबाबत धर्म गुरूंकडे तक्रार करणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
दीपिका आणि रणावीरचं १४-१५ नोव्हेंबरला इटलीमध्ये लग्न झालं. रविवारी सकाळी हे जोडपं लग्नानंतर भारतात परत आलं आहे. २१ नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीरने जवळच्या नातेवाईकांसाठी रिसेप्शनचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर २८ नोव्हेंबरला बॉलिवूडमधील तसंच इतर मित्रमैत्रींणीसाठी दुसरं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.
अधिक वाचा : सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक रिलीझ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola