• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

मुलीला डोळा मारणे पडले महागात ; रोडरोमिओला ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 19, 2020
in राज्य, गुन्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
अकोला शेगाव
12
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

बीड (प्रतिनिधी) : रोमिओगिरी करणे किती महागत पडू शकते हे बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाने सिद्ध झाले आहे. एकटक बघून डोळा मारणाऱ्या एका रोडरोमिओस बीड न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा दंड न भरल्यास त्याला आणखी एक महिना तुरुंगात काढावा लागणार आहे.

पुरूषोत्तम ज्ञानदेव वीर (वय २४, रा. टाकळगाव) असे या रोडरोमिओचे नाव आहे. त्याने शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथील रस्त्यावर एका मुलीकडे बराच वेळ एकटक बघून तिला डोळा मारला. याबाबत संबंधीत पीडित महिलेने पाटोदा पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०१८ रोजी तक्रार दिली होती. पीडितेच्या तक्रारीवरून पाटोदा पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी विरोधात रितसर आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण ७ साक्षीदार नोंदवविण्यात आले. सदर प्रकरणात भा. द. वी. कलम ३५४ अन्वये आरोपीस ३ वर्षांची सक्तमजुरी आणि ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने जर दंड भरला नाही तर शिक्षेमध्ये अजून एका महिन्याची वाढ केली जाईल, असे आदेश न्यायधीशांनी दिल्याची माहिती सरकार पक्षाकडील वकील अ‍ॅड. अनिल धसे आणि सहाय्यक अ‍ॅड. संगिता धसे यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सुनावणी प्रकरणी आयपीआय इंगळे यांनी सहकार्य केले. बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी आरोपीस ही शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान, या निकालामुळे रोडरोमिओंना चांगलीच जरब बसणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि महिलांना अनेकदा रोडरोमिओंचा प्रचंड त्रास शन करावा लागतो. बदनामीच्या भीतीने महिला याबाबत तक्रार करत नाहीत आणि त्यामुळे रोडरोमिओ अधिक मस्तवाल होतात. मात्र, या प्रकरणात पिडीतेने धैर्य दाखवत पोलिसात तक्रार दिली आणि अखेरपर्यंत पाठपुरावा केला. परिणामी, त्या रोडरोमिओला न्यायालयाने जबर शिक्षा ठोठावली. या निकालापासून प्रेरणा घेत अनेक पीडिता हिमतीने पुढे येत स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडतील अशी अपेक्षा आहे.

अधिक वाचा : चोरीतील आरोपींना दोन वर्षांचा सश्रम कारावास

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

मुख्यमंत्र्यांची भेट नाकारल्याने आमदार सिरस्कारांनी रस्त्यातच ठाण मांडले

Next Post

अग्रक्रमाच्या योजना ‘मिशन मोड’वर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अग्रक्रमाच्या योजना ‘मिशन मोड’वर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पैसे थकवल्याने फॅशन डिझायनरची हत्या; 3 संशयितांना अटक

पैसे थकवल्याने फॅशन डिझायनरची हत्या; 3 संशयितांना अटक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.