बीड (प्रतिनिधी) : रोमिओगिरी करणे किती महागत पडू शकते हे बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाने सिद्ध झाले आहे. एकटक बघून डोळा मारणाऱ्या एका रोडरोमिओस बीड न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा दंड न भरल्यास त्याला आणखी एक महिना तुरुंगात काढावा लागणार आहे.
पुरूषोत्तम ज्ञानदेव वीर (वय २४, रा. टाकळगाव) असे या रोडरोमिओचे नाव आहे. त्याने शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथील रस्त्यावर एका मुलीकडे बराच वेळ एकटक बघून तिला डोळा मारला. याबाबत संबंधीत पीडित महिलेने पाटोदा पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०१८ रोजी तक्रार दिली होती. पीडितेच्या तक्रारीवरून पाटोदा पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी विरोधात रितसर आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण ७ साक्षीदार नोंदवविण्यात आले. सदर प्रकरणात भा. द. वी. कलम ३५४ अन्वये आरोपीस ३ वर्षांची सक्तमजुरी आणि ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने जर दंड भरला नाही तर शिक्षेमध्ये अजून एका महिन्याची वाढ केली जाईल, असे आदेश न्यायधीशांनी दिल्याची माहिती सरकार पक्षाकडील वकील अॅड. अनिल धसे आणि सहाय्यक अॅड. संगिता धसे यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सुनावणी प्रकरणी आयपीआय इंगळे यांनी सहकार्य केले. बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी आरोपीस ही शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, या निकालामुळे रोडरोमिओंना चांगलीच जरब बसणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि महिलांना अनेकदा रोडरोमिओंचा प्रचंड त्रास शन करावा लागतो. बदनामीच्या भीतीने महिला याबाबत तक्रार करत नाहीत आणि त्यामुळे रोडरोमिओ अधिक मस्तवाल होतात. मात्र, या प्रकरणात पिडीतेने धैर्य दाखवत पोलिसात तक्रार दिली आणि अखेरपर्यंत पाठपुरावा केला. परिणामी, त्या रोडरोमिओला न्यायालयाने जबर शिक्षा ठोठावली. या निकालापासून प्रेरणा घेत अनेक पीडिता हिमतीने पुढे येत स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडतील अशी अपेक्षा आहे.
अधिक वाचा : चोरीतील आरोपींना दोन वर्षांचा सश्रम कारावास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola