जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीचे मेसेजिंग अॅप WhatsApp वर आणखी एका भन्नाट फिचरचा समावेश झाला आहे. या नव्या फिचरमुळे आता व्हिडिओ कॉलिंगची मजा केवळ दोघात नव्हे तर ग्रुपमध्ये देखील घेता येणार आहे.
फेसबुकच्या F8 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये या वर्षाच्या शेवटी व्हाट्सएप्प वर व्हॉईस आणि व्हिडिओ ग्रुप कॉलिंगची सेवा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारपासून व्हाट्सएप्प चे हे नवे फिचर सर्वांसाठी खुले झाले आहे. हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युझर्ससाठी देण्या आले आहे. व्हाट्सएप्प च्या या ग्रुप कॉलिंग फिचरमध्ये एकाच वेळी चार लोकांना बोलता किंवा व्हिडिओ कॉल करता येणे शक्य होणार आहे.
व्हाट्सएप्प ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून युझर्स व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल सेवा वापरत आहेत. आता त्यात आणखी एक नवे फिचर अॅड केले जात असून यापुढे मित्रांसह ग्रुप कॉल करता येणार आहे.
व्हाट्सएप्प युझरला सुरुवातीला एका व्यक्तीला कॉल करावा लागेल. त्यानंतर त्या कॉलमध्ये अन्य दोघांचा समावेश करता येऊ शकले. जर तुमच्या व्हाट्सएप्प वर हे फिचर आले नसले तर गुगल प्ले स्टोअरमधून व्हाट्सएप्प अपडेट करून घ्यावे लागेल.
हेही वाचा : जिओ चा नवीन फोन मिळणार १०९५ रुपयांमध्ये