जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारतीय खेळाडू श्रीकांत किदाम्बी ने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. श्रीकांत किदाम्बी ने आयर्लंडच्या नहात न्युगेनचा २१-१५, २१-१६ असा दोन सेटमध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
तर, या स्पर्धेमध्ये मलेशियाच्या ली चोंग वेई आणि दक्षिण कोरियाच्या सोन वान हो यांनी माघार घेतल्याने भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधी सोमवारी मिश्र दुहेरीत तीन भारतीय जोड्यांनी आणि पुरुष दुहेरीत एका भारतीय जोडीने पहिल्या फेरीची वेस ओलांडताना विजयी सलामी दिली.
हेही वाचा : १९ सप्टेंबरला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने