तेल्हारा(शुभम सोनटक्के)- “लोकजागर मंच” चे अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांच्या पुढाकाराने आता तेल्हारा शहर आणि तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चांगली सोय होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी सुंदर वातावरण असलेली अभ्यासिका आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सुरू होत असून मान्यवरांच्या उपस्थितीत या अभ्यासिकेचे लोकार्पण होणार आहे.
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असते,पण अभ्यासासाठी चांगले वातावरण न मिळाल्याने ते बरेचदा मागे पडतात..शहरातील मुलांना घरी चांगले मार्गदर्शन, वातावरण तर मिळतेच आणि शहरात सुसज्ज अशा अभ्यासीकांचाही त्यांना लाभ घेता येतो…
अशीच सोय ग्रामिण विद्यार्थ्यांची व्हावी यासाठी लोकजागर मंच ने पुढाकार घेतला. तेल्हारा येथील मेन रोडवरील साई गणेश संकुल येथे निवांत वातावरणात आता विद्यार्थ्यांना आरामात अभ्यास करता येईल.अनिलभाऊ गावंडे यांनी सर्व गरजू विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ही सोय उपलब्ध करून दिली आहे… अनिलभाऊंच्याच उपस्थितीत सोमवार दिनांक 23 जुलै रोजी या अभ्यासिकेचे लोकार्पण होणार आहे, यावेळी लोकजागर मंचचे कार्याध्यक्ष सुधाकर खुमकर, सरचिटणीस पुरुषोत्तम आवारे पाटील,अशोक घाटे, जि. प.सदस्य गोपाल कोल्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या समारंभानंतर तेल्हारा,बेलखेड,हिवरखेड आणि अकोट येथे विठ्ठल भक्तांना फराळाचे वाटप करण्यात येईल.तेल्हारा येथे रामजप मंडळ, बेलखेड येथील श्री गजानन महाराज मंदिर,हिवरखेड येथील भवानी मंदिर आणि अकोट येथील श्री विठ्ठल मंदिरात ही व्यवस्था करण्यात आली आहे.
अभ्यासिका लोकार्पण आणि विठ्ठल नामाचा गजर व फराळ या दोन्ही कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकजागर मंच चे तेल्हारा तालुका अध्यक्ष गोपाल जळंमकार आणि अकोट तालुका अध्यक्ष गजाननदादा बोरोकार यांनी केले आहे…..