बाळापूर(रमेश शेळके)- पिकविमा ऑनलाईन पध्दतीने शासनाने सुरु केला आहे. परंतु पिक विमा उतरविण्यासाठीची ऑनलाईन पध्दती डोके दुखी ठरत आहे. ऑन लाईन सर्वर काम करत नसल्यामूळे विमा उतरवीण्याचे काम सेतू केंद्रावर बंद असुन पिक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्याची भटकंती होत असल्याने दिलेल्या मुदतीच्या आत शेतकऱ्यानां विमा उतरविने शक्य नसल्याने पिक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणीचे निवेदन दि. २०। ७। २०१८ ला बाळापूर तहसीलदार दिपक पुंडे यांना प्रहार संघटने कडून देण्यात आले. तालुक्यातील बरेच गावात बोंडअळी नुकसानीचे अनुदान अजुन मिळाले नसल्याने बोंडअळीच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत शेतकरी असुन अशा गरंजु शेतकऱ्यांना त्वरीत अनृदान
वाटप करा. मागील वर्षिचा खरीप हंगामाचा पिक पिमा अजून पर्यत बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. विमा लाभार्थीना त्वरीत पिक विम्याचे पैस विमा लाभार्थीना मिळावे चा मागण्या साठी प्रहार संघटने कडून तहसीलदार बाळापूर यांना निवेदन देण्यात आले. आमच्या निवेदनाची त्वरीत दखल घेतली नाहीतर प्रहार संघटना आंदोलन करेल. निवेदन देताना रमेशभाऊ शेळके, भरत नळकांडे डिंगाब२ ठाकरे, गोपाल जळमकार, शेख आसीफभाई, सागर हिवराळे, संदीप दांडगे, उमेश ठाकरे, ओम खासे, शिवचंद्र नळकांडे, बलवंत दांडगे आदी कार्यकतै व शेतकरी उपस्थीत होते.
अधिक वाचा – GST नवीन बदल; काय झाले स्वस्त, कश्यावर आता किती GST
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola