वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या २८व्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात सॅनटरी नॅपकिनला जीएसटी बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर २८ टक्के कर असणाऱ्या अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत एकूण ३५ वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत साखरेवरील सेस संदर्भात अहवाल सादर करण्यात आला. मात्र याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते खालील प्रमाणे…
अधिक वाचा – GST नवीन बदल; काय झाले स्वस्त, कश्यावर आता किती GST
व्यवसाय करणाऱ्यांसाठी जीएसटी रिटर्नचे नियम सोपे करण्यावर एकमत
आता जीएसटी रिटर्नसाठीचा फॉर्म केवळ एका पानाचा असेल. त्याच बरोबर महिन्यात ३ वेळा रिटर्न भरण्याच्या कटकटीपासून मुक्तता
५ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना तिमाही रिटर्न भरावा लागेल
या गोष्टींवर सुरु आहे विचार…
बैठकीत दैनंदिन वापराच्या संदर्भातील ३० वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा विचार करण्यात आला. यात सॅनटरी नॅपकिनसह लिथियम आयन बॅटरी, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, वॉटर कुलर आणि आईक्रीम तयार करण्यात येणारी उपकरणांचा समावेश आहे. हॅडलूम आणि कुटीर उद्योगाशी संबंधित ४० वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याची शक्यता आहे. तसेच मार्बल स्टोनपासून तयार करण्यात आलेल्या देव आणि देवींच्या मुर्तीं स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच डेकोरेटीव्ह वस्तूंवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर होण्याची शक्यता आहे.