महाराष्ट्र शासनाने अखेरीस शिक्षक भरती साठीचे पवित्र पोर्टल सुरु केले आहे.
या निर्णयाचे उद्दिष्ट्य आहे की केवळ गुणवत्तेच्या उमेदवाराला नोकरी मिळेल आणि शिक्षण संस्थेचे मालक इच्छुक उमेदवारांकडून लाच देऊ शकणार नाहीत.
Teachers are the backbone of a strong education system. Focusing on eradication of corruption & streamlining appointment of qualified teachers, launched ‘Pavitra’ web portal for teacher recruitment in Maharashtra. Candidates can file in the application at https://t.co/BbskVojbfN pic.twitter.com/ikvyohbABL
— Vinod Tawde (@TawdeVinod) July 6, 2018
नोंदणी कशी करावी (How to register):
- उमेदवाराने पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम www.edustaff.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
- वेबसाईटच्या डाव्या बाजूला PRIVATE नावाच्या TAB ला क्लिक करा
- मग REGISTRATION या TAB वर क्लिक करा
- मग SELECT ROLE TAB वर क्लिक करा व APPLICANT सिलेक्ट करा
- USER ID या रकान्या मध्ये आपला शिक्षण भरती व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा बैठक क्रमांक हा पवित्र प्रणाली साठी स्वतःचा USER ID म्हणून नमूद करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. (नमुना Example : SED_TAIT_ 073458)
- मग पासवर्ड तयारकर (पासवर्ड तयार करतांना त्यामध्ये मोठ्या लिपीतील किमान एक इंग्रजी मुळाक्षर, लहान लिपीतील किमान एक मुळाक्षर, किमान एक अंक, एक स्पेशल CHARACTER (उदा : @#$% इत्यादी). Example : Pass@123
- पासवर्ड असा तयार करा जो सहज लक्षात राहील व पासवर्ड कोणाबरोबर शेयर करू नका
- मग स्वतःचा मोबाईल क्रमांक टाका व मोबाइलला नंबर टाकल्यावर जो OTP नंबर मोबाइलमध्ये येइल तो OPT च्या रकान्यात टाका
- मग स्क्रीन वर असलेला Captcha Code खाली नमूद करा व Register या बटनावर क्लिक करा (अशाप्रकारे आपण LOGIN व्हाल)
- Login झालाव्यावर Application Details या बटनावर क्लिक करा व Personal Details , Address for Communication, TET Exam Details, Qualification Details ही सर्व माहिती भरा
- सर्व माहिती भरल्यावर उमेदवाराने सर्व भरलेली माहिती नीट पडताळून पाहावी कारण अर्ज submit केल्यानंतर उमेदवाराला माहिती मध्ये बदल करता येत नाही.
अधिक वाचा : रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी ची सुवर्णसंधी










