अकोट(सारंग कराळे)- अकोट शहरातील सराईत गुन्हेगार इस्लामुदिन जाहिरुद्दीन उर्फ जाहीर कोंड्या रा कंगार पुरा अकोट ह्याला अकोट शहर पोलिसांनी घातक हत्यारासह कार सह ताब्यात घेतले, अकोट शहरातील सराईत गुन्हेगार इस्लामुदिन जाहिरोद्दीन उर्फ जाहीर कोंड्या ह्यांचेवर पोलिस स्टेशन अकोट शहर येथे जबरी चोरी, प्राणघातक हमला, दंगल, दुखापत ह्या सारखे गुन्हे दाखल असून तो गावात घातक हत्यार घेऊन दहशत माजविण्याच्या सवयीचा आहे,अकोट शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक बऱ्याच दिवसा पासून त्याच्या मागावर होते, दिनांक २९ जुलै रोजी अकोट शहर पोलिसांना खात्री लायक माहिती मिळाली जहिर कोंड्या हा घातक हत्यारासह चार चाकी वाहनाने अंजनगाव रोड ने येत आहे , त्यावरून पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय घायल,पोलीस कर्मचारी जितेंद्र कातखेडे,विजय सोळंके,संतोष गावंडे,राहुल वाघ,नासीर शेख,गुड्डू पठाण,अघडते, मंगेश खेडकर,उमेश सोळंके यांच्या पथकाने अंजनगाव रोडवर दबा धरून माहित प्रमाणे जहीर कोंड्या हा कार घेऊन येत असतानाच त्याला थांबण्याचा इशारा केला असता त्याने गाडी न थांबवता वेगाने अकोट शहराकडे कार नेली असता गुन्हे शोध पथकाने त्याचे पाठलाग करून त्याला अकोट शहरातील कांगारपुरा भागामध्ये त्याला कार थांबवण्यास भाग पाडून त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कार ची झडती घेतली असता त्यामध्ये तीन तलवारी आणि एक चाकू मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून कार सह एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांचा मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड करीत आहे.