• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Our Media by Our Media
October 11, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
110 1
0
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
16
SHARES
792
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.11 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करून दि. 19 एप्रिलनुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. त्यानुसार अपघातात शेतक-याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत मिळते, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले. योजनेत 10 ते 75 वयोगटातील अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता वहितीधारक शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकर्‍याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ति) अशा एकूण दोघांसाठी योजना राबविण्यात येत आहे.

विमा कंपन्या तसेच विमा सल्लागार कंपन्याकडून योजना व्यवस्थित राबविली जात नसल्यामुळे राज्य शासनाने आधीची विमा योजना बंद करून सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. नवी योजना प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी लागू आहे. त्यामुळे योजनेतील पात्र व्यक्तीला केव्हाही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी चालू असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास नव्या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख, अपघातामुळे दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख, अपघातामुळे एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख, तसेच अपघाताने एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख आर्थिक सहाय्य देण्यात येते. जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकरी, शेतक-यांचे वारसदार यांनी दि. 19 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात घटना घडलेली असेल तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. किरवे यांनी केले आहे.

अपघातग्रस्त शेतक-याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसिलदार यांना घटना झाल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करतील. त्यानंतर तालुका कृषि अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांना सादर करतील. त्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत संबंधित शेतकरी/शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येवून संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात येईल.

योजनेत रस्ता अपघात,रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यात/चावण्यामुळे जखमी,मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू , दंगल, अन्य कोणताही अपघात या अपघातांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, योजनेत नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध,.सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा समावेश असणार नाही.

Previous Post

आरोग्यदायी ‘ब्लॅक राईस’चे गुळसुंदे येथे यशस्वी उत्पादन

Next Post

राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
एकनाथ शिंदे

राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

mumbai high court

शाळांमध्ये सुविधा पुरवण्यात राज्य सरकार अपयशी : मुंबई उच्च न्यायालय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.