• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शाळांमध्ये सुविधा पुरवण्यात राज्य सरकार अपयशी : मुंबई उच्च न्यायालय

Our Media by Our Media
October 12, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
99 1
0
mumbai high court
14
SHARES
713
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : सरकारी अनुदानित शाळांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहे ठेवण्यासाठी प्रभावी आणि पुरेशा उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने शाळकरी मुलींच्या स्वच्छतागृहांची योग्य ती देखभाल ठेवणे, मुलांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम आहे. मात्र, शाळांमध्ये मुलांसाठी योग्य सुविधा आहेत की नाही, याकडे न्यायालयाला लक्ष द्यावे लागत असेल तर सरकार म्हणून तुम्ही काय काम केले? असा संतप्त सवाल खंडपीठाने राज्य सरकारला केला.

२०१५ मध्ये केंद्र सरकारकडून मासिक पाळीबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली. कोनाच् संकटकाळात राज्य शासनाकडून  याकडे दुर्लक्ष झाले. तसेच अस्मिता योजनेअंतर्गत शासनाला ऑगस्ट महिन्यात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्यात आली. परंतु शासनाला सॅनिटरी नॅपकिन्स पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्या नोंदणीकृतच नाहीत. त्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करावा, त्याचबरोबर कमी किमतीत रेशन दुकानावर सरकारने ती उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी करणारी याचिका निकिता गोरे आणि वैष्णवी घोळवे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अभिनव चंद्रचूड यांनी राज्यभरातील सरकारी अनुदानित शाळांतील मुलींच्या गैरसोयींचा पाढाच न्यायालयात वाचला. अनेक स्वच्छतागृहांमध्ये पाणी नाही तर काही ठिकाणी उपलब्ध असलेले सॅनिटरी नॅपकिन बदलण्यासाठी जागा नाही. त्यामुळे अनेक मुलींना शाळेकडे पाठ फिरवावी लागली आहे. ही गंभीर वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना चंद्रचूड यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या अहवालातील दयनीय स्वच्छतागृहांच्या छायाचित्रांकडे लक्ष वेधले. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा समाचार घेताना विधी सेवा प्राधिकरणाच्या अहवालाच्या अनुषंगाने बाजू मांडण्याचे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी ६ डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

राज्य सरकारची निष्क्रियता

जुलै महिन्यामध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विधी सेवा प्राधिकरणाला सरकारी अनुदानित शाळांमधील मुलींच्या स्वच्छतागृहांची स्थिती तसेच इतर सुविधांचा आढावा घेण्यासाठी शाळांना आकस्मिक भेटी देण्याचे निर्देश दिले होते. तसेच त्या पाहणीचा अहवाल मागवला होता. खंडपीठाने जिल्हा पातळीवर कनिष्ठ न्यायालयाच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समिती नियुक्ती केली होती. ही समिती नेमण्यामागे राज्य सरकारची निष्क्रियता कारणीभूत आहे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली.

Previous Post

राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Next Post

सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्थापित करू शकतात ! नितीन गडकरी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Nitin Gadkari

सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्थापित करू शकतात ! नितीन गडकरी

भारताची धुवाधार सुरूवात, सातव्या षटकातच ५० धावा पुर्ण

भारताची धुवाधार सुरूवात, सातव्या षटकातच ५० धावा पुर्ण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.