• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आरोग्यदायी ‘ब्लॅक राईस’चे गुळसुंदे येथे यशस्वी उत्पादन

Our Media by Our Media
October 10, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
145 1
0
आरोग्यदायी ‘ब्लॅक राईस’चे गुळसुंदे येथे यशस्वी उत्पादन
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

रायगड : ब्लॅक राईस अर्थात फॉरबीडन्ट राइस म्हणजेच बहुगुणी काळा तांदूळ आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात गुळसुंदे येथील प्रयोगशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी यश मिळविले आहे. एकरी 15 क्विंटल उत्पादकता साध्य करण्यात गाडगीळ यशस्वी झाले आहेत. गाडगीळ यांना राज्य शासनाचा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.दरम्यान साधारण 120-130 दिवसांत हा काळा तांदूळ तयार झाला आहे. शेतकर्‍यांनी पारंपरिक तांदळाच्या वाणाबरोबर इतर ही काळ्या तांदळासारखे नाविन्यपूर्ण वाण लावल्यास त्याला चांगला भाव मिळेल व शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होइल, असा विश्‍वास गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे.

ब्लॅक राईस हा फॉरबीडन्ट राइस म्हणून ओळखला जातो. ही जपानमधील तांदळाची मूळ जात आहे. जपानमधील फक्त राजघराण्यासाठी हा तांदूळ पिकवला जात होता. या मध्ये अन्थोसॅयनीन हे नैसर्गिक पिग्मेंट आहे, ज्यामुळे याला काळा रंग प्राप्त होतो व उकडल्यानंतर याला डार्क परपल कलर (जांभळा) येतो. उकड्ण्याआधी चोवीस तास तांदूळ भिजत ठेवून नंतर तो उकडला जातो, अशीही माहिती गाडगीळ यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

काळ्या तांदळात अ‍ॅन्टीऑक्सीडंट गुणधर्म

काळ्या तांदळात अ‍ॅन्टीऑक्सीडंट गुणधर्म असल्याने याला विशेष मागणी आहे, त्याच बरोबर या तांदळात आर्यन, व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स मोठ्याप्रमाणात आढळतात. फायबर मोठ्याप्रमाणात आढळते व त्यामुळेच वेट लॉससाठी हा तांदूळ उपयोगी पडतो . या तांदळात मधुमेह व कोलेस्टेरॉल कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. त्याच प्रमाणे या तांदळात अ‍ॅन्टीकॅन्सर गुणधर्म असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. विशेष करुन डेझर्ट, केक, ब्रेड, नूडल्स यासाठी हा तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

इंडोनेशिया, चायना, म्यानमार तसेच उत्तर भारतात हा तांदूळ पिकवला जातो

इंडोनेशिया, चायना, म्यानमार तसेच उत्तर भारतात हा तांदूळ पिकवला जातो. चार गुंठे क्षेत्रावर गाडगीळ यांनी काळ्या तांदळाचे उत्पादन घेतले आहे. तर उर्वरीत क्षेत्रावर आंबेमोहर तांदळाचे जिल्ह्यात प्रथमच उत्पादन घेतले आहे. जे ही आपल्याकडे पहिल्यांदाच घेतले आहे. उत्पादन चांगले आहे. साधारण एका गुंठ्याला 40 किलो म्हणजे एकरी 15 क्विंटल उत्पादकता साध्य करण्यात यश आले आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील भात संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी देखील गाडगीळ यांच्या भातशेतीची पहाणी करुन या यशस्वी प्रयोगावर शिक्कामोर्तब केले आहे.

काळा तांदूळ मानवी आरोग्याकरीता अत्यंत बहूगुणी 

मानवी आरोग्याकरीता अत्यंत बहूगुणी असा हा काळा तांदूळ आहे. जे लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी भात खाणे टाळतात, त्या लोकांसाठी काळा तांदूळ फायदेशीर आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी काळा तांदूळ फायदेशीर आहे. यात आढळणारे फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

कर्करोगासारखे रोग टाळण्यात मदत 

काळ्या तांदळात भरपूर मात्रेत फायबर आढळते. जे बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर करतात. याने पोट फुगणे आणि पचनसंबंधित तक्रारही दूर होते. दररोज याचे सेवन केले जाऊ शकते. काळ्या तांदळात एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत आढळते, जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोगासारखे रोग टाळण्यात मदत करते. याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. या तांदळांचा गडद काळा रंग यात आढळणारे विशेष अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे ते त्वचा आणि डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठीही फायदेशीर आहे. काळ्या तांदळाचे सेवन शरीरातून हानिकारक आणि नको असलेले तत्त्वांना बाहेर फेकून आंतरिक सफाईमध्ये मदत करते. हे लिव्हरला स्वच्छ करण्यातही मदत करत असते. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काळ्या तांदळाची शेती फायदेशीर ठरते, असेही गाडगीळ यांनी सांगितले.

Previous Post

नियमाचे पालन न करणाऱ्या अन्न विक्रेत्यांकडून ४ लाख दंड वसूल

Next Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

एकनाथ शिंदे

राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.