रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याला उजाळा देणारा आणि नाती परत घट्टपणे बांधून ठेवणारा सण. हा सण अगदी पुराणकाळापासून साजरा करण्यात येतो; आजही त्यातील गोडवा टिकून आहे. जम्मू-काश्मीरमध्येही सीमेवरील जवानांना येथील मुलींनी राखी बांधत रक्षाबंधन सण साजरी केला.
रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमेचा दिवस हा सगळ्यांसाठीच एक खास दिवस असतो. भाऊ आणि बहिणीला एका धाग्याने बांधणारा आणि एकमेकांचे प्रेम व्यक्त करणारा हा दिवस. नात्यांना उजाळा देणारा आणि नाती परत घट्टपणे बांधून ठेवणारा असा हा दिवस. या दिवसाची सगळेजण वाट पाहत असतात. आपले जवान आपले जवान डोळ्यात तेल घालून, तत्परतेने आपल्या देशाचे रक्षण करत असतात. अशा जवानांनाही सण साजरा करता यावा म्हणून जम्मू-काश्मीरमधील स्थानिक मुलींनी जवानांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला. उधमपूरमध्ये शालेय मुलींनी CRPF जवानांच्या हातावर राखी बांधत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.