अकोट : अकोट शहराचे आराध्य दैवत श्री संत नरसिंग महाराज मंदिर प्रांगणात सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या लोकजागर मंच व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलदादा गावंडे यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त विररसाने ओतप्रोत भरलेला पोवाडा व स्फूर्ती गीतांचा ऐतिहासिक “महाराष्ट्राचा शाहिरी बाणा” या कार्यक्रमाचे आयोजन दि ६ जून रोजी करण्यात आले होते.
यावेळी सर्वप्रथम सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, हारार्पण व दिप प्रज्वलन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिलदादा गावंडे तथा प्रहार पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकजागर मंचचे पदाधिकारी, ह.भ.प शिवदास महाराज गाडेकर, कॅप्टन सुनिल डोबाळे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झी युवा फेम विजेता युवा शाहिर विक्रांतसिंह राजपूत तथा सज्जनसिंह राजपूत यांनी काळजाला भिडणाऱ्या, लढवय्य कर्तृत्व मांडणाऱ्या आपल्या स्फुर्ती गीतांनी, पोवाडा गायनाने व विररस कथनाने या ऐतिहासिक कार्यक्रमातून शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राजमाता जिजाऊ, छ्त्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, उदारता, दानशूरता, युद्ध निती, युद्धकला, धाडसी वृत्ती बाणेदारपणा इत्यादी गुण आपल्या स्फुर्तिगीतांतून मांडून श्रोत्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण केले. या कार्यक्रमाला नागरिकांनी व महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला.
याप्रसंगी अनिल दादा गावंडे यांच्या हस्ते शाहीर विक्रांतसिंह राजपूत,शाहीर सज्जनसिंह राजपूत, यांचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तर अकोट राजपूत क्षत्रिय समाज, अकोली जहांगीर येथील राजपूत कुमावत समाज यांच्यावतीने सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रकाश गायकी यांनी तर आभार गजानन बोरोकार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे व लोकजागर मंचचे मनीष भांबुरकर, राजासाहेब गावंडे, गजानन बोरोकार अनंतराव सपकाळ, आकाश बरेठीया, योगेश जायले, अर्जुन गाळखे,सागर उकडे , गोलू भगत ,अचल बेलसरे ,सचिन काळे, देवा कायवाटे, प्रतिक रोहणेकर , परीक्षित देशमुख, अविनाश बघेले ,श्याम फाळके ,अक्षय गावंडे , गोपाल जळमकर, आशिष उकळकर, दिलीप पिवाल, प्रफुल दबडघाव , सागर गळसकार,अंकीत शेळके,विनोद सगणे, गुरुदेव इसमोरे , तथा लोकजागर मंचचे सर्व पदाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
अनिलदादा सारख्या लोकांची आज समाजाला गरज आहे..- शाहीर विक्रांत सिंह राजपूत.
लोकजागर मंचच्या वतीने सतत शेतकरी मार्गदर्शक, युवकांना रोजगारनिर्मिती संदर्भात, समाज प्रबोधनाचे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचे काम अनिलदादा गावंडे करत आहेत त्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून विनोद बाळे, कॅपटन सुनिल डोबाळे,गजानन जायले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाहीर विक्रांत सिंह यांनी नेता असावा तर अनिल दादा गावंडे यांच्या सारखा असावा, आज समाजाला अशा लोकांची गरज आहे, “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा…” याप्रमाणे अनिल दादा यांचे कार्य अविरत सुरू आहे. असे भावनिक उदगार त्यांनी काढले.