अकोला दि. 16 :- नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी येत्या १९ तारखेपर्यंत नोंदणी करावी असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे यांनी केले आहे.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दि.१९ पर्यंत https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/international/candidate/ या लिंकवर जाऊन नोंदणी करावयाची आहे. दि.२० मार्च ते २७ मार्च या कालावधीत स्क्रिनिंग व ऑनलाईन भाषा चाचणी होईल. दि.२८ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत उमेदवारांचे ऑनलाईन मॅपिंग होईल. दि.११ ते ३० एप्रिल दरम्यान विविध शहरांमध्ये प्राथमिक फेऱ्या होतील. दि.८ ते १५ मे या कालावधीत अंतिम फेऱ्या तर दि.२६ मे रोजी समारोप होईल. या मेळाव्यात ज्या उद्योजकांना, कंपन्यांना सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/international/company/ या लिंकवर जाऊन आली नोंदणी करावी. या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२४-२४३३८४९ व भ्रमणध्वनी क्रमांक ९६६५७७५७७८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.