• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंचगंव्य व गो-आधारित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा; गोवंश संवर्धन काळाजी गरज-वैज्ञानिकांचे सूर

Our Media by Our Media
March 3, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
81 2
0
पंचगंव्य व गो-आधारित पदार्थ निर्
12
SHARES
592
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 3 :- पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ प्रशिक्षण कार्यशाळेत पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थांचे महत्व व त्याचे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारे फायदे याबाबत वैज्ञानिकांनी मार्गदर्शन केले. तसेच विषजन्य औषधी व खतांच्या अतिवापरामुळे होत असलेले दुष्परिणाम टाळण्याकरिता सेंद्रीय शेती व पंचगंव्य औषधीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गोवंश सवंर्धन करणे हे काळाजी गरज आहे, असा सूर वैज्ञानिकांनी कार्यशाळेत लावला.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतील सेमिनार हॉल येथे प्रशिक्षण कार्यशाळाचे उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, भारतीय पशुकल्याण बोर्डचे सदस्य सुनिल मानसिंहका, आदर्श गोसेवा एंव अनुसंधान प्रकल्प म्हैसापूरचे विवेक बिडवाई, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पुशविज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.डि.जी. दिघे, प्रकल्‍प संचालक डॉ. प्रशांत कपले, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा(आत्मा) प्रकल्प संचालक आरिफ शहा आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

 प्रशिक्षण कार्यशाळेत सुनिल मानसिंहका यांनी मार्गदर्शनात म्हणाले की, रासायनिक खतांमुळे उत्पादनात वाढ झाली असली तर त्यांचा परिणाम मानवी आरोग्य व जमिनीच्या सुपिकतेवर होत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्यवर्धक जीवनमानाकरिता सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. तसेच गायीपासून उत्पादित होणाऱ्या पंचगंव्य औषधी व गो आधारित पदार्थांचा वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईलच शिवाय निरोगी राहण्यास मदत होईल. या प्रशिक्षण कार्यशाळेचा सर्व शेतकरी, पशुधन, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गोआधारित संशोधनावर भर देण्याची आवश्यक असून पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. पंचगव्य औषधीवर केलेले संशोधन नागरिकापर्यंत पोहोचवा. धार्मिक व आर्युवेदिक शास्त्रात पंचगव्य औषधीचे महत्व सांगितले आहे. त्याचा वापर प्रत्येकांने करणे हे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अजय पोहरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवात दिपप्रल्वलन करुन झाली. त्यानंतर ‘आधुनिक काळात पंचगव्याचे उपयोग आणि सदृढ आरोग्याचे महत्व’ या घडीपत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्‍प संचालक डॉ. प्रशांत कपले यांनी केले. सुत्र संचालक मनिष इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दिलीप बदुकले यांनी केले.

पंचगव्य म्हणजे काय ?

गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. पंचगव्य गोमातेने आपल्या पुर्वजांना व संपूर्ण मानवजातीला दिलेली एक औषधी देणगी आहे. प्राचीन काळापासून गोमूत्राचा उपयोग मानवाच्या विविध आजारांवर उपचार किंवा शुद्धीकरण म्हणूनही केला जातो. याचा वापर विविध त्वचारोग, पोटाचे आजार, ह्रदयविकार, किडनीचे आजार, क्षयरोग, लठ्ठपणा, उतारा, अँटीफ्लाट्युलेंट, जलोदर अशा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी गोमूत्र आणि शेणाचा यशस्वीपणे वापर केला जात आहे. अनेक संशोधकांनी विविध परिस्थितींसाठी गोमूत्र डिस्टिलेट थेरपी वापरली आहे आणि ते वेदनाशक म्हणुन उपयुक्त असल्याचे आढळले आहे.  

गोमूत्रातील घटक व त्याचे महत्व

पाणी 95 टक्के, मूत्र खनिजे 2.5 टक्के, मीठ हार्मोन्स एन्झाइम्स 2.5 टक्के. युरीया- प्रथिने चयापचय उत्पादन, मजबूत प्रतिजैविक एजंट, युरिक ऍसिड-प्रतिजैविक क्रिया कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, नायट्रोजन- लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ व मूत्रपिंड उत्तेजित करते. सल्फर– रक्त शुद्ध व आतड्यासंबंधी पेरिस्टॉलिसिस वाढवते. तांबे– चरबी जमा होण्यावर नियंत्रण ठेवते, लोह– रक्तातील आरबीसीचे उत्पादन वाढवते, सोडियम– रक्त शुद्ध व हापर ॲसिडिटी नियंत्रीत करते. पोटॅशियम– क्षुधावर्धक व स्नायूंचा थकवा दूर करते. तर अन्य क्षार– बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ व केटोआसिड्रस प्रतिबंधित करते.

गाईचे शेण व त्याचे महत्व

गाईचे शेण हे गाईच्या खालेल्या अन्नपदार्थाचे न पचलेले अवशेष आहे. ज्यामध्ये विष्ठा आणि लघवी, लिग्निन, सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज हि प्रमुख रचना आहे. गायीच्या शेणाचा वापर जैव खत म्हणून केला जातो.  जैविक शेतीच्या संवर्धनासाठी आणि आरोग्यदायी अन्नधान्य निर्मितीसाठी गायीचे शेण अत्यंत उपयुक्त आहे.

Previous Post

अकोल्याची इलाक्षी मोरे झळकली “सातारचा सलमान” मराठी चित्रपटात

Next Post

विजाच्या कडकडासह अतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचा इशारा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

विजाच्या कडकडासह अतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचा इशारा

narendra-modi-on-corona

PM Narendra Modi: केंद्र सरकारमुळे देशातील कोट्यवधी रुग्णांची ८० हजार कोटींची बचत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.