तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणचे प्रमाण वाढले असून शेती सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे. वानच्या पाण्याचे आरक्षण थांबविण्यात यावे यासाठी पाणी बचाव आंदोलन समितीच्या पदाधिकारी यांनी आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आकोल्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणाचे पाणी आरक्षित करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी तेल्हारा तहसील कार्यालयाजवळ आवार तालुका संग्रामपूर येथील दिपक शंकरराव ईगळे आशिष प्रमोद अवचार यांनी गेल्या 14 फेब्रुवारी पासून उपोषण सुरू केले आहे. त्याच्या उपोषणाला शेतकऱ्याकडुन वाढता पाठीबा मिळत आहे.
या शिवाय विविध गावातुन ग्रामसभेचे ठराव देवुन समर्थन दिले जात आहे. त्याच बरोबर विविध संघटनाच्या पदाधिकारी यांनी उपोषणाला भेटी देऊन आपले समर्थन दिले आहे. तेल्हारा येथील ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकारी, बुलढाणा जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोगळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर व पदाधिकारी यांनी उपोषणाला भेटी देऊन आपले समर्थन दिले दरम्यान तेल्हारा येथील पाणी बचाव आंदोलनाच्या पदाधिकारी यांनी आकोला जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन वानच्या पाण्याचे आरक्षण थांबविण्याची मागणी केली निवेदनावर तेल्हारा येथील प स चे माजी सभापती अतुल पाटील ढोले, हरिदास वाघ,मनोहर चितलागे, गोपाल मंत्री, मंगेश घोंगे योगेश विचे,योगेश आप्पा बिडवे, अनंता तळोकार सिध्देश्वर तिव्हाणे प्रविण शर्मा, तुळशीराम मंत्री, केशव वाघ,हिगणीचे नराजे यांच्या सह शेकडो पाणी बचाव आंदोलन समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.