• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रजासत्ताक दिन उत्साहात ध्वजवंदन,संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भारावले अकोलेकर

Our Media by Our Media
January 27, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
94 1
0
Republic Day
14
SHARES
681
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 27 :–  भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे हा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. या सोहळ्यात झालेले ध्वजवंदन, पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर झालेले शानदार संचलन आणि देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे उपस्थित अकोलेकर भारावले.

मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक गोकुलराज यांच्या नेतृत्वात व पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलन करण्यात आले. त्यात विविध सुरक्षा व सेवा पथकांनी सहभाग घेतला. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व सांघिक कवायती सादर केल्या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ, विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षक डॉ. मिनाक्षी गजभिये, अति, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ, निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार तसेच विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, शहिदांचे कुटुंबिय, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

निलेश गाडगे आणि किशोर बळी यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.

विविध पुरस्कारांचे वितरण

कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

1. ई-चावडी ऑनलाईन मोहिम उत्कृष्ट कामगिरी -अकोला तहसिल कार्यालय.

2. जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी केल्याबद्दल – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे

3. संगणक मित्र तलाठी पुरस्कार- प्रसाद रानडे

4. वृक्षरोपण चळवळ व स्वस्तिक पॅटर्न यशस्वी राबविल्याबाबत – वृक्षप्रेमी नाथन

5. पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्य गणुवत्ता यादीत गुणवंता प्राप्त विद्यार्थी-

1) संस्कृती विनायक पाठक(बालशिवाजी माध्यमिक शाळा),

2) आदित्य भविष्य गुरुदासानी (प्रभात किड्स स्कुल)

जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांना तंबाखु व्यसनमुक्तीची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रीय मतदार दिवस; लोकशाही बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी आवश्यक

Next Post

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर येथील स्वयंसेवक सन्मानित.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर येथील स्वयंसेवक सन्मानित.

पातूर

कालबाह्य होत चालल्या प्राचीन वस्तू, जतन करणारे ध्येयवेडे संजय गाडगे यांचा ठाणेदार हरीश गवळी यांच्या कडून सत्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.