अकोला,दि. 28 :- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अधीक्षक मिरा पागोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.