• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रंथोत्सवास उत्साहात प्रारंभ वाचक व्हा आणि समृद्ध व्हा- गजलनवाज भिमराव पांचाळे

Our Media by Our Media
December 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन
22
SHARES
606
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.12 :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास वाजत गाजत काढण्यात आलेली ग्रंथदिंडी व उपस्थित वाचनप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला. ‘वाचक व्हा आणि समृद्ध व्हा’, अशा शब्दात गजलनवाज भिमराव पांचाळे यांनी उद्घाटनप्रसंगी ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या.

येथील श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी जिल्हा ग्रंथालय कार्यालय ते श्री शिवाजी महाविद्यालयापर्यंत शानदार ग्रंथदिंडी काढून या महोत्सवास सुरुवात झाली.पारंपारिक वेशभुषेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींची लेझीम पथके, पारंपारिक वाद्यांच्या तालावर निघालेल्या या ग्रंथदिंडीने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले. ही दिंडी श्री शिवाजी महाविद्यालयात आल्यावर महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथोत्सवास विधीवत उद्घाटन करुन प्रारंभ झाला.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

ग्रंथोत्सव

उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.गजानन पुंडकर हे उपस्थित होते. या सोहळ्यास निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, गजलनवाज भिमराव पांचाळे, ज्येष्ठ साहित्यीक प्रतिमाताई इंगोले, ज्येष्ठ साहित्यीक प्रा. मधू जाधव, प्राचार्य डॉ. प्रतिभा कोकाटे, सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती अरविंद ढोणे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, डॉ. संजय तिडके, ग्रंथमित्र एस. आर.बाहेती, रामभाऊ देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करुन ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी ग्रंथोत्सव स्थळी उभारण्यात आलेल्या ग्रंथदालनाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रंथ दिंडी

पांचाळेंनी सांगितले गजल ओळींतून ग्रंथमहात्म्य

वाचलेली , ऐकलेली माणसे गेली कुठे?

पुस्तकातून पाहिलेली, भेटलेली माणसे गेली कुठे?

रोज अत्याचार होतो आरशावर आता

आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?

या ओळी गाऊन भिमराव पांचाळे यांनी सभागृहाची दाद मिळविली. आणि वाचक व्हा समृद्ध व्हा अशा शब्दात त्यांनी ग्रंथोत्सवाच्या शुभेच्छा उपस्थित नागरिकांना दिल्या.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, ग्रंथदिंडी,परिसंवाद,व्याखान, एकपात्री प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रमांची साहित्य रसिक व ग्रंथप्रेमींना खास मेजवानी असणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी दिली आहे.

आपल्या भाषणात संगिताताई अढाऊ यांनी ग्रंथांचे महत्त्व सांगितले. समाजात वाचनसंस्कृतीची जोपासना होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथोत्सवासारखे कार्यक्रम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

संजय खडसे म्हणाले की, माणसे घडविण्यासाठी ग्रंथांशिवाय पर्याय नाही. ग्रंथ हे खऱ्या अर्थाने माणसाचे गुरु आहेत.ग्रंथवाचनातून जीवनमूल्य कळतात. माणसाला जगतांना विचारांची गरज असते, ते विचार पुस्तके देतात. ग्रामिण भागातही सुजाण नागरिक घडविण्यासाठी ग्रंथालयांचे मोठे योगदान आहे. त्यासाठी ग्रंथालय चळवळ आणि वाचन चळवळीला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. कोकाटे, मधु जाधव, प्रतिमा इंगोले, रामभाऊ देशपांडे यांनीही ग्रंथोत्सवास आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात ॲड.गजानन पुंडकर यांनी ग्रंथोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

ग्रंथोत्सव

रविवारी होणारे कार्यक्रमः- रविवार दि. ११ रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११ वा. ‘ग्रंथाने मला काय दिले’ विषयावर परिसंवाद. अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, सहभागः महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथमित्र एस.आर.बाहेती आणि बाबुजी देशमुख सार्वजनिक वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र. सुत्रसंचालन-राम मुळे.दुपारी दोन वा. ‘अडम धडम’ हे कविसंमेलन. अध्यक्ष- राजाभाऊ देशमुख, सहभाग- धीरज चावरे, प्रशांत वरईकर, हिम्मत ढाळे, देवलाल तायडे. त्यानंतर ‘मी वाचन संस्कृती बोलते’ हा एकपात्री प्रयोग, सादरकर्त्या- हर्षदा इंदाने. सायं. ४ वा.समारोप सत्र.अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार. उपस्थितीः सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती अरविंद ढोणे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, तहसिलदार सुनिल पाटील, अशोक चंदन, डॉ. हेमंत सपकाळ.

या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी केले आहे.

Top 15 Bollywood Celebrities Who Live A Super Luxurious Life

Previous Post

मुर्तिजापूर येथील गुलाम नबी आझाद गर्ल्स हायस्कूल येथे कायदे विषयक मार्गदर्शन

Next Post

ग्रंथोत्सव २०२२; परिसंवादः ग्रंथाने मला काय दिले? सर्वोत्कृष्ट ग्रंथ ‘संविधान’, त्यामुळेच मिळाला स्वाभिमान- संजय खडसे

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
ग्रंथोत्सव

ग्रंथोत्सव २०२२; परिसंवादः ग्रंथाने मला काय दिले? सर्वोत्कृष्ट ग्रंथ ‘संविधान’, त्यामुळेच मिळाला स्वाभिमान- संजय खडसे

पक्षीमित्र संमेलन

शालेय पक्षीमित्र संमेलनातून विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाचे धडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.