• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शालेय पक्षीमित्र संमेलनातून विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाचे धडे

Our Media by Our Media
December 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
80 1
0
पक्षीमित्र संमेलन
19
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१२ :- जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला, निसर्गकट्टा, अकोला वन विभाग व महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ व्या शालेय पक्षीमित्र संमेलनातून शालेय विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.१०) पक्षी निरीक्षणाचे धडे देण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षी निरीक्षण या छंदाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी व त्या माध्यमातून पक्षी व पर्यावरण संर्वधनाची दिशा दाखविण्यासाठी शनिवारी माऊंट कारमेल हायस्कुल हॉलमध्ये ७ वे शालेय पक्षीमित्र संमेलन पार पडले. सर्वोत्कृष्ट निबंध लिहीणारी विद्यार्थीनी चैताली बाळ हिला संमेलनाच्या अध्यक्षाचा मान मिळाला. माऊंट कारमेलचे प्राचार्य फादर मॅथ्यू करीगल, जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्य) डॉ. सुचिता पाटेकर, पक्षी अभ्यासक कौस्तुभ पांढरीपांडे (कारंजा), अनुल मनवर (अकोला), निसर्गकट्टाचे संस्थापक अमोल सावंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन करुन संमेलनाचे उद्घाटन झाले.त्यानंतर कौस्तुभ पांढरीपांडे यांनी तणमोर पक्ष्यावर तर अनुल मनवर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. डॉ. संतोष सुरडकर यांनी पक्षी निरिक्षण एक अनुभव या विषयावर सादरीकरण केले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

पक्षीमित्र संमेलनानिमित्त निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धेत प्रथम चैताली बाळ, द्वितीय सुमित निकम, तृतीय अर्थव पाटील व उत्तेजनार्थ पारितोषिक निधी जाधव व शिवगंध जोत यांना मिळाले. वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम कु. तनुश्री दाभाले , बाल शिवाजी हायस्कुल, द्वितीय पुर्वा किशोर बळी, प्रभात किड्स, तृतीय तेजस्विनी गुरव धनाबाई विद्यालय बाळापूर, प्रोत्साहन पर आयना आसिमोद्दीन शाहबाबू विद्यालय, पातूर, व अदिती वानखडे खंडेलवाल विद्यालय यांना पारितोषिके मिळाली. पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक जि.प. शाळा, गोपालखेड , द्वितीय क्रमांक राजेश्वर कॉन्व्हेंट , तृतीय क्रमांक सन्मित्र पब्लिक स्कुल व उत्तेजनार्थ यशोदाबाई इंगळे विद्यालय व्याळा यांना मिळाले. वक्तृत्व स्पर्धेसाठी डॉ. स्वाती दामोदरे, डॉ. निशाली पंचगाम व श्रीमती कांचन पटोकार तर पथनाट्य स्पर्धेसाठी डॉ. प्रदीप अवचार व अमोल इंगळे हे परीक्षक म्हणून लाभले होते.

मोबाईल फोटोग्राफी मध्ये सायली अंभोरे प्रथम, सक्षम तायडे द्वितीय व मोहम्मद सोशल मोहम्मद अनिस याला तृतीय क्रमांक मिळाला उप वनसंरक्षक अर्जुन के. आर, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर व वृक्षप्रेमी विवेक पारसकर, कांचन पटोकार, निसर्गकट्टा चे अध्यक्ष अजिम शेख व महाराष्ट्र पक्षीमित्रचे विदर्भ समन्वयक अमोल सावंत यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. विवेक पारसकर यांना कृतज्ञता पुरस्कार व मंगेश तायडे यांना दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. हिमांशु पाटेकर यांच्या पक्ष्यांच्या फोटोचे टेबल कँलेडरचे प्रकाशन करण्यात आले. सुत्र संचालन संदिप वाघडकर यांनी केले. संमेलनात ४० शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मिलिंद शिरभाते, डॉ. हरिष मालपाणी, अजय फाले, मनोज लेखनार, राहुल ओईंबे, संतोष सहारे, प्रेम अवचार, विजय पवार यांनी परिश्रम घेतले.

Top 50 Merry Christmas Wishes 2022

Previous Post

ग्रंथोत्सव २०२२; परिसंवादः ग्रंथाने मला काय दिले? सर्वोत्कृष्ट ग्रंथ ‘संविधान’, त्यामुळेच मिळाला स्वाभिमान- संजय खडसे

Next Post

‘बालकांचे कायदे’, याविषयी मार्गदर्शन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
बालकांचे

‘बालकांचे कायदे’, याविषयी मार्गदर्शन

सौरभ कटियार

अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची आज (दि.१३) व उद्या (दि.१४) ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.