तेल्हारा: स्थानिक डाॅ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस व्यक्तिमत्व विकास व्याख्यान आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. काय॔क्रमाची सुरूवात डाॅ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, डाॅ. गोपाळराव खेडकर व संत गाङगे बाबा यांच्या प्रतिमांच्या पूजन, हाराप॔ण व दिप प्रज्वलनाने करण्यात आली.
काय॔क्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाल ढोले होते. प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्राध्यापक डाॅ. संतोष कायंदे, राज्यशास्ञ विभाग प्रमुख, श्री शिवाजी महाविद्यालय,अकोट प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी या प्रसंगी माननीय श्री दादाराव पाटील पाथ्रीकर, आजीवन सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. काय॔क्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांनी समाजसेवा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती इत्यादी उपक्रमाद्वारे राष्ट्राची सेवा करण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजनेव्दारे विद्यार्थ्यांना उपलब्ध होते तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते असे प्रतिपादन केले. प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्राध्यापक डाॅ कायंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद केली व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रा.डाॅ. राहुल सुडके, प्रा.एम.एम.कवरके यांची समयोचित भाषणे झाली. काय॔क्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ. जी.ओ.जोंधळेकर यांनी केले. काय॔क्रमाचे सूञ संचालन कु. श्रेया मनतकार व कु. वैष्णवी मोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन सम्यक बोदडे याने केले. काय॔क्रमाच्या यशस्वीतेसाठी सह काय॔क्रम अधिकारी प्रा. विजय खुमकर, सचिन ढोले, अभिजीत लोखंडे रा.से.यो.चे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.