अकोला दि.17: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारतीय डाक विभागा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात शासनाच्या विविध योजनाचे माहिती फलक व घोषणा देवून प्रभात फेरीव्दारे सोमवारी (दि.15) जनसामान्यापर्यंत पोहोचवली. तसेच डाक विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक संजय डी. आखाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी डाक विभागाच्या अविरत सेवेचा गौरव करताना डाक विभाग हे सर्व सामान्य नागरिकांना सर्वोत्कृष्ट सेवा देणारे महत्वाचे खाते आहे, असे प्रतिपादन केले. तर वरिष्ठ अधिक्षक संजय आखाडे यांनी डाक विभागाच्या सेवा घराघरात पोहोचविण्याचे आवाहन सर्व डाक कर्मचाऱ्यांना केले. यावेळी डाक विभागाचे ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त सहाय्यक पोस्ट मास्तर तुळशीराम बोबडे यांना साहित्य अकादमीव्दारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबाबत त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डाक विभागाद्वारे PLI, RPLI, POSB खाते, सुकन्या खाते, IPPB नवीन खाते, AePS, CELC, TATA AIG, PMFBY मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र व प्रोत्साहनपर बक्षीस देवून गौरविण्यात आले. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत असलेले शाखा डाकपाल, सहायक शाखा डाकपाल, पोस्टमन, डाक सहायक आणि उपडाकपाल यांचा समावेश होता. कार्यक्रमाला मोठया संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पश्चात मुख्य डाकघरापासून प्रभात फेरी सुरु झाली. यामध्ये डाकविभागाचे कर्मचारी व अधिकारी सहभाग होता. प्रभात फेरी बसस्थानक, टॉवर चौक तेथून परत बसस्थानक मार्गे मुख्य डाकघर येथे राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यावेळी वरिष्ठ डाकपाल हरिबाबू वंदना, सहाय्यक डाक अधिक्षक सुनील एम. हिवराळे, सहाय्यक डाक अधिक्षक एन.एस. बावस्कर, तक्रार निरीक्षक तथा प्रभारी डाक निरीक्षक एस. एस. नानिर आदी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कार्यालय सहायक दिपक पाथरकर तर आभार प्रदर्शन सहाय्यक अधिक्षक नीलकंठ बावस्कर यांनी केले.