तेल्हारा- तेल्हारा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण रूग्णालय तेल्हारा येथे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात 19 एप्रिल रोजी घेण्यात आले,या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती. श्रीमती उज्वला काळपांडे व उपसभापती मा. मोहिब गुरुजी यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश असोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैदयकीय अधिकारी डॉ. चींमंकर व सर्व तेल्हारा तालुका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थित आरोग्य शिबीर घेण्यात आले.
या आरोग्य शिबिरात ५३० रुग्णांस तपासणी करून त्याना लाभ देण्यात आला. व यात १०९ रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ देण्यात आला तर ९० Health ID कार्ड काढण्यात आले. या शिबिराचे यशस्वी नियोजन ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.अशोक तापडिया व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण चव्हाण यांनी केले .