अकोट(देवानंद खिरकर): मा.के. आर.अर्जुना उपवनसंरक्षक अकोला वनविभाग अकोला व मा. सु. अ. वडोदे सहाय्यक वनसंरक्षक (वने) मा. आर. एन. ओवे वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला (प्रा) अकोला वनविभाग अकोला यांचे मार्गदर्शनाखाली अकोट वर्तुळ वनकर्मचारी ,आर. टी. जगताप. वनपरिमंडल अधिकारी अकोट वर्तुळ, यांचे अधिनस्त वनकर्मचारी. सी. एम. तायडे वनरक्षक ए. पी. श्रीनाथ वनरक्षक सोपान जी. रेळे, मोहन वानखडे, सोमंत रजाने, दिपक मेसरे यांनी आज दि. 05/04/2022 रोजी अकोट वनवर्तुळा अंतर्गत मौजा जऊळखेड, व मौजा पाटी.
येथील मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेऊन व वेळेचे गांभीर्य राखून वन्यप्राणी काळवीट मादी यांची शिकार करून मांस विकतेवेळी रंगेहात आरोपी पकडले. आरोपी नामे 1) ज्ञानेश्वर गजानन जामेवार रा. जऊळखेड ता. अकोट 2) सुज्योत राधकीसन मुंडाले रा. पाटी ता. अकोट यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून दोन मोटर सायकल क्रमांक 1) mh 30 by 5985 hf deluxe 2) mh30 bk 7348 super slender व दोन मोबाईल 1) नारझो ए 10 2) जिओ मोबाईल व वन्यप्राणी काळवीट मादी यांचे मांस एकूण 15 किलो इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले सदर आरोपी चे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.