अकोट(देवानंद खिरकर) :- अकोट तालुक्यातील रामापूर नजीकच्या पुनर्वसित धारगड, धारूळ, सोमठाना, केलपाणी या गावांना अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांनी भेट दिली. व तेथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व इतरही सुविधेबाबत स्वतःहा पाहणी केली. या गावातील काही गवळी लोकांचा जागेचा प्रश्न बरेच दिवसा पासुन प्रलंबित होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेत लवकरच त्यांच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यात येईल.
असे त्या नागरिकांना जिल्हाधिकारी मॅडम यांनी आस्वासन दिले. नागरीकांच्या इतरही समस्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत अकोट तहसीलदार निलेश मडके, अकोट बिडीओ, अकोलखेड मंडळ अधिकारी निळकंठ नेमाडे, धारूर ग्रामसेवक सुभाष नागे, क्रुषी सहायक ठाकरे, रामापूर तलाठी बोकाडे, कृषी सहायक रावनकर, माजी जि.प.सदस्य. गजानन डाफे, गजानन गावंडे, पत्रकार विठ्ठल येवोकार, अनिल आतकड, सुधीर भील, छोटु घोरड, अजय तिवाने, प्रवीन बोंद्रे, संग्राम गवळी, देवा गवळी, यांची उपस्थीती होती.