अकोला- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते, कीर्तनकार, पखर विचारवंत सोपानदादा कानेरकर यांचे शिवजयंती महोत्सवानिमित्त खडकी अकोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक खडकी येथे दिनांक 22/2/2022 मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय, खडकी अकोला यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुरेश काळे, प्रमुख पाहुणे म्हणून खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्रीरंग सणस, प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. केशव गोरे, प्रा. डॉ.संकेत काळे, प्रा. विजय अग्रवाल. प्रा. संदीप भोवते, डॉ. रावसाहेब ढोके, डॉ.सुधीर देशमुख, डॉ. गणेश बोरकर, प्रा. कविता कावरे, बळीराम अवचार, शैलजा परळीकर, नवनाथ बडे, मनोहर वागतकर, डॉ. रोहित काळे, प्रफुल्ल पवार, अर्चना धर्मी, केतन वाकोडे, प्रेमसिंग जाधव, बळवंत पाटील, पांडुरंग पाचपुते, डॉ. दिपाली देशमुख, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी खरा छत्रपती चा इतिहास जाणून घेण्यासाठी या जाहीर व्याख्यानाला खडकी परिसरातील नागरिकांनी, महिलांनी, युवकांनी, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक आनंद शिंदे, अतुल भांगे, शुभम काळे, अमोल नजधने, राम गालट, मयुर परडे, अजय शेगोकार, अमित मिटकरी विवेक बड,, हरिओम राखोडे, आशिष मानकर, शुभम कचरे, कृष्णा ढगे, गौरव वाळूकार, गोविंद भुतेकर, गणेश सातारकर आदी युवकांनी व गावकऱ्यांनी या जाहीर व्याख्यानला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.