• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राजकारण

नाशिक : ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणीकडे राजकीय पक्षांचे लक्ष

Our Media by Our Media
February 8, 2022
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
83 1
0
ओबीसी-आरक्षण
20
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

नाशिक : ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणप्रश्नी आज मंगळवारी (दि. 8) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. नाशिकसह राज्यातील 18 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी महत्त्वाची असल्याने त्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. यामुळे आगामी निवडणुकांसंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा केल्याशिवाय या वर्गाला आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने स्पष्ट केली असून, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. लोकसंख्येतील ओबीसींच्या आकडेवारीबाबत सध्या उपलब्ध माहितीच्या आधारावर निवडणुका होऊ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने सादर केला होता. त्यावर गेल्या 19 जानेवारी रोजी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने राज्य मागासवर्ग आयोगाला सरकारने दिलेला डाटा तपासून त्या आधारावर पुढील कार्यवाही करण्याची शिफारस राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगाला करण्याचे निर्देश दिले होते.

मागासवर्ग आयोगाने राज्याकडून डाटा मिळाल्यानंतर दोन आठवड्यांत आपला अंतरिम अहवाल सादर करावा. सरकारची सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांबाबतची आकडेवारी केंद्र सरकारच्या जनगणनेतील आकडेवारीपेक्षा स्वतंत्र असावी. असे न्यायालयाने नमूद केले होते. तसेच ही व्यवस्था केवळ येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतीच असून, भविष्यातील निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी आपल्या आधीच्या आदेशांनुसार त्रिसूत्रीची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

तरच ओबीसी आरक्षण लागू होईल ओबीसींच्या आकडेवारीबाबत सध्या उपलब्ध असलेला डाटा राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला सादर केला आहे. त्यानुसार आयोगाने अंतरिम अहवाल सादर करणार असून, आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडू शकतात. यामुळे मंगळवारी (दि. 8) होणारी सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार असून, न्यायालयाने मान्य केल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते.

Tags: NasikOBC Reservationpolitical
Previous Post

Pune Crime : सावकारीची बळी ठरलेल्या वृध्द महिलेला भीक मागण्याची वेळ

Next Post

शिवाजी पार्क पोस्ट ऑफिसचे स्थलांतर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
444003_Shivaji_Park_Akola_S.O

शिवाजी पार्क पोस्ट ऑफिसचे स्थलांतर

PALAKMANTRI MEETING

दिव्यांग कल्याणाचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करा- ना. बच्चू कडू ;१९ फेब्रुवारी पासून दिव्यांग कल्याण भवन कार्यान्वित करण्याचेही निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.